Wednesday, 14 March 2018

Ladies luggage डब्बा

मुंबई लोकल म्हणजे मुंबई ची लाईफलाईन आणि अश्याच या मुंबई च्या लाईफ लाईन मधून लाखो जण प्रवास करत असतात. तसेच रोज सकाळी महाविद्यालयात जाणार मुले देखील हजारो असतात. सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान लोकल मधेच प्रचंड गर्दी असते  आणि ह्याच कालावधीत आमची कॉलेज असतात . प्रथम वर्ग आणि आणि द्वितीय वर्ग अस सकाळच्या सुमारास काही अंतर नसत जेवढी द्वितीय वर्गात लोक लटकत असतात तेवढीच माणसे प्रथम वर्गात सुद्धा आढळून येतात आणि त्यात एक आला लेडीस समान डब्बा ह्या डब्यात सकाळी कामावर जाण्याऱ्या स्त्रिया असतात आणि बऱ्याच संख्येने कॉलेज ला जाणारे विद्यार्थी  देखील बऱ्याच संख्येने असतात. आणि त्यांना तशी परवानगी ही आहे कारण त्यांना त्यांच्या थांब्यावर उतरायलाच भेटत नाही म्हणून हमखास त्या डब्यातून प्रवास करतात. मी ही साठ्ये कॉलेज चा विद्यार्थी आहे मी ही कित्तेक वेळा जनरल मधून कॉलेज ला जायचो तेव्हा santacruz ला उतरलो आहे कारण एवढी गर्दी असते की उतरआयला नाही भेटत मग मी सुद्धा ladies luggage ने प्रवास करायला लागलो. पण आमच्या विद्यार्थ्यामुले स्त्रियांना किती त्रास होते ते कळत होतं त्यात त्या डब्बात भाजीवाले अजून काही काकी आपलं समान घेऊन असतात त्यांना देखील त्या गर्दीमुके अडचणी येतात . एके दिवशी त्याच डब्ब्यात मला अश्याच एक काकी म्हणाल्या की "तुम्ही लेटर का नाही देत युनिव्हर्सिटी ला की आम्हाला सुद्धा एक वेगक डब्बा द्या विदयार्थी साठी " तेव्हा मनात आलं अरे हो की ह्या काकी बरोबर बोलतायत अस जर झाल तर सर्वच सुरळीत होईल तर सरकारने नकीच ह्या गोष्टीचा विचार करावा अस मला वाटत .....

No comments:

Post a Comment