मुंबईकर आणि वडापाव यांचं एक अतुट नात आहे म्हणजे छोटीशी भूक भागवणारा हा चविष्ट पदार्थ म्हणजे वडापाव. असाच हा वडापाव आपण 2 ते 3रुपये पासून खल्लाय मला आठवत तर मी 2 रीत असताना माझ्या शाळेत 3 रुपयाला वडापाव मिळायचा आणि आता त्याची किंमत 10 ,15, 20 अशी झाली आहे. परंतु मी जिथे राहतो देवीपाडा बोरिवली तिथे आजूनही 5 रुपये ला वडापाव मिळतो. मारवाडी आहे तो त्याला काय कसं परवडत ते अजूनही कोणालाच नाही ठाऊक परंतु तो वडापाव मात्र फारच चविष्ट बनवतो. अगदी त्याच आकाराचा जेवढा आपण 10 12 रुपये ला घेतो त्याचा आकाराचा वडा तो विकतो. आणि विशेष गोष्ट अशी की तो वडापाव बनवायला तो मारवाडी त्याची बायको आणि त्याची मुलगी अशे तीन जण तिथे गादीवर उभे असतात. मारवाडी वडे तळायला बायको पाव कापायला तर मुलगी वडापाव customers ना द्यायला असा त्यांचं रोजचा दिनक्रम होता. वडपावसोबत तो कटलेस देखील 7 रूपये ला विकतो. पण खरंच आमच्या area तल्या सर्वानाच त्याने अचंबित करून ठेवलय पण सर्व खुश देखील आहेत कारण त्यांना 10 रुपयात 2 वडापाव भेटतात आणि त्याचा आनंद लुटतात काही जणांची मत आहेत को त्याची बटाट्याची शेती असेल तो किंवा तो बटाटा मध्ये काहीतरी वेगळं मिक्स करत असेल असे ही काही अंदाज बांधले गेले पण गेली 5 वर्ष तो यशस्वीरीत्या 5 रुपये लाच वडापाव विकत आहे . आनि त्याचा धंदा तुफान चालतो खूप जणांनी त्याच्यासारखे प्रयत्न केले 5 रुपये ला वडापाव विकायला पण त्यांच्यासारखी चव कुठेच नाही आली त्यामुळं ते अपयशी ठरले मला जर कधी वडापाव खायची लहर आली की मी त्याच्याकडेच जाऊन वडापाव खातो
स्वस्त पण मस्त पण 😉
Wednesday, 14 March 2018
स्वस्त पण मस्त पण
Facebook चा लोप
मी नववी ला असताना माझ फेसबुक ला account उघडलं. मनामध्ये खूप उत्सुकता होती. तेव्हा काही दिवसभर मोबाईल नव्हते हातात 'पपा कामावरून घरी आल्यावर त्याच्याकडेच मोबाईल घेऊन MTNL च कार्ड होत म्हणून 5 मिनिटांचे 2 ते 3 रुपये उडायचे. आणि तेवढ्यात समाधान मानून मी असा रोज facebook चा वापर करत असे. मग 10 वि झाली हातात मोबाईल आला facebook चा वापर 5 मिनिट ते कित्तेक तास झाला हे कळलच नाही . प्रोफाइल pic upload करणे कव्हर फोटो अपलोड करणे चालू झाले . आणि त्या छोट्याश्या फोन वर facebook use करण्याची मज्जाच काही और होती मी तर अक्षरशः अधीन झालो होतो facebok च्या त्यांनतर मग smatphone आले facebook चा वापर अधिक मनोरंजक होऊ लागला पाहिलं website वर fb open करायचो आटा त्याचा app आलाय पण काही कालांतराने facebook चा कंटाळा यायला लागला कारण whatsapp हा app बाजारात उतरला होता जिकडे तिकडे whatsapp चीच चर्चा होऊ लागली whatsapp वर लोक facebook पेक्षा जास्त online राहू लागले. मग instagarm त्यानंतर hike ,snapchat असे अनेक social मीडिया apps बाजारात येऊ लागले जणू काही fb ला सगळे विसरून गेले होते त्यानंतर fb ने snapchat च बघुन स्टोरी हे एक नवीन गोष्ट आणली त्यात थोडीशी लोकांनी रंजकता दाखवली पण त्याचाही कंटाळा यायला लागला. पण जे काही पूर्वी जेवढा लोक fb चा वापर करायचा त्याच्या अर्ध्या पटीने fb ची लोकप्रियता कमी झाली आहे असे मला वाटते.........
Ladies luggage डब्बा
मुंबई लोकल म्हणजे मुंबई ची लाईफलाईन आणि अश्याच या मुंबई च्या लाईफ लाईन मधून लाखो जण प्रवास करत असतात. तसेच रोज सकाळी महाविद्यालयात जाणार मुले देखील हजारो असतात. सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान लोकल मधेच प्रचंड गर्दी असते आणि ह्याच कालावधीत आमची कॉलेज असतात . प्रथम वर्ग आणि आणि द्वितीय वर्ग अस सकाळच्या सुमारास काही अंतर नसत जेवढी द्वितीय वर्गात लोक लटकत असतात तेवढीच माणसे प्रथम वर्गात सुद्धा आढळून येतात आणि त्यात एक आला लेडीस समान डब्बा ह्या डब्यात सकाळी कामावर जाण्याऱ्या स्त्रिया असतात आणि बऱ्याच संख्येने कॉलेज ला जाणारे विद्यार्थी देखील बऱ्याच संख्येने असतात. आणि त्यांना तशी परवानगी ही आहे कारण त्यांना त्यांच्या थांब्यावर उतरायलाच भेटत नाही म्हणून हमखास त्या डब्यातून प्रवास करतात. मी ही साठ्ये कॉलेज चा विद्यार्थी आहे मी ही कित्तेक वेळा जनरल मधून कॉलेज ला जायचो तेव्हा santacruz ला उतरलो आहे कारण एवढी गर्दी असते की उतरआयला नाही भेटत मग मी सुद्धा ladies luggage ने प्रवास करायला लागलो. पण आमच्या विद्यार्थ्यामुले स्त्रियांना किती त्रास होते ते कळत होतं त्यात त्या डब्बात भाजीवाले अजून काही काकी आपलं समान घेऊन असतात त्यांना देखील त्या गर्दीमुके अडचणी येतात . एके दिवशी त्याच डब्ब्यात मला अश्याच एक काकी म्हणाल्या की "तुम्ही लेटर का नाही देत युनिव्हर्सिटी ला की आम्हाला सुद्धा एक वेगक डब्बा द्या विदयार्थी साठी " तेव्हा मनात आलं अरे हो की ह्या काकी बरोबर बोलतायत अस जर झाल तर सर्वच सुरळीत होईल तर सरकारने नकीच ह्या गोष्टीचा विचार करावा अस मला वाटत .....
Saturday, 10 March 2018
मानसशास्त्राचा तास....
वर्गात प्राध्यापकांनी मानसशास्त्राचा तास घ्यायला सुरुवात केली होती. तेवढ्यात मागून एका मुलाने शिट्टी वाजवली .प्राध्यापकांनी शिट्टी कोणी वाजवली असं विचारल्यावर संपूर्ण वर्ग शांत बसला मात्र कोणीच नाव सांगितलं नाही .
सरांनी हातातला खडू खाली ठेवला आणि म्हणाले ,'आपला आजचा तास इथेच संपतो आहे पण राहिलेला वेळ सार्थकी लावण्यासाठी मी तुम्हाला कालच रात्री घडलेला एक किस्सा सांगतो .
किस्सा ऐकण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी कान टवकारले .
" काल रात्री उशिरापर्यंत मला झोप येत नव्हती .वेळ काढायचा म्हणून गाडीत पेट्रोल भरून येऊ असा विचार माझ्या मनात आला म्हणून गाडी काढून मी पेट्रोल भरून घेतलं .पेट्रोल भरल्यावर सहजच मी एका शांत रस्त्यावर गाडी वळवली .रस्त्याच्या कोपऱ्यावर एक अतिशय मादक सुंदर ललना उभी होती . मी गाडी तिच्याजवळ थांबवून तिला विचारलं की मॅडम, मी आपली काही मदत करू शकतो का ? हो , मला घरापर्यंत सोडू शकलात तर फार बरं होईल . गाडीचा दरवाजा उघडून मी तिला आत घेतलं आणि तिच्या घराच्या दिशेने गाडी वळवली .वाटेत आम्ही विविध विषयांवर चर्चा करत होतो . सौन्दर्यासोबतच बुद्धिमत्तेची देणगी लाभलेल्या निवडक स्त्रियांमध्ये मी तिचा समावेश करेन .
तिच्या घराशी पोहचल्यावर तिने लाजत लाजत कबूल केले की माझ्या सहृदय वागण्यामुळे ती माझ्या प्रेमात पडली आहे . मी ही तिच्या सौन्दर्याची आणि बुद्धिमत्तेची तारीफ करत तिच्या प्रेमात पडल्याची कबुली तिला दिली .एकमेकांशी बोलताना मी तिला माझ्या पेशाबद्दल सांगितलं . निरोप घेताना आम्ही फोन नंबरची अदलाबदल केली .अगदी शेवटच्या क्षणी तिने मला सांगितलं की तिचा भाऊ मी शिकवत असलेल्याच महाविद्यालयात शिकतो ,त्यामुळे होणारा दाजी या नात्याने मी त्याची काळजी घ्यावी. मी तिला त्याचं नाव विचारलं त्यावर तिने उत्तर दिलं की तुम्ही त्याला त्याच्या खास सवयीवरून लगेच ओळखाल ....
'तो अतिशय उत्तम शिट्टी वाजवतो .'
प्राध्यापकांच्या या वाक्यावर अख्खा वर्ग मगाशी शिट्टी वाजवलेल्या विद्यार्थ्यांकडे बघायला लागला .
प्राध्यापक महाशय त्या विद्यार्थ्याकडे बघून हसून म्हणाले ," माझी मानसशास्त्राची पदवी / ज्ञान मी विकत घेतलेलं नाही तर स्वकष्टाने अर्जित केलं आहे ."
........ निघ बाहेर वर्गाच्या ...